मजा कलर थेरपीची

November 23, 2008 12:06 PM0 commentsViews: 51

23 नोव्हेंबर, मुंबई प्रीती खानरंग हे सगळ्यांनाच हवे असतात. ते प्रत्येकाच्या आवडीचे असतात. आता या रंगाचा उपयोग मानसिक स्वास्थ्य चांगलं राखण्यासाठी, मूड बदलण्यासाठी केला जात आहे. मानसिक स्वास्थ चांगलं रहावं म्हणून अनेक प्रकारच्या थेरपी आहेत. यात आणखी एका थेरपीची भर पडली आहे. ती म्हणजे कलर थेरपी. वेगवेगळ्या रंगाचा वापर करुन व्यक्त्मित्त्व खुलवायचं काम ही थेरपी करते. अमिशा मेहता या कलरथेरपीच्या एक्स्पर्ट म्हणून ओळखल्या जाताता. मूळच्या पेंटर असणा-या अमिशा पटेल ह्या कलर थेरपीकडे अपघातानेच वळल्यात.कलर थेरपीबाबत बोलताना अमिशा मेहता सांगतात, "चौकोनी पेपवर निरनिराळ्या रंगांच्या सहाय्याने स्ट्रोक मारले जातात. त्या स्ट्रोकच्या माध्यमातून जो काही फॉम तयार होतो तो आपलं मन रिझवतो " अमिशा पटेल स्वत: कलर थेरपीसाठी उपयुक्त असणा-या फ्रेम तयार करून विकतात. ऑर्डरप्रमाणे बनवून देतात. पॉझिटीव्ह एनर्जी देणा-या रंगाशी खेळा असा सल्ला यावेळी अमिशा पटेल यांनी दिला.

close