गिलानींनी झाली 30 सेंकदाची शिक्षा

April 26, 2012 5:24 PM0 commentsViews: 6

26 एप्रिल

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांच्याविरोधातल्या भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा सुरू करण्यासाठी स्वित्झरलँड सरकारला पत्र लिहण्याचे आदेश कोर्टाने गिलानींना दिले होते. पण गिलानींनी त्याचं पालन केलं नाही. याप्रकरणी कोर्टाने त्यांना दोषी ठरवत फक्त तीस सेकंदांची शिक्षा केली. कोर्टाचे कामकाज संपताच गिलानींची सुटका झाली. गिलानी आता राजीनामा देणार का ? अशी चर्चा रंगली होती. पण हा खटला गुन्हेगारी स्वरुपाचा नसल्यामुळे गिलानी राजीनामा देण्याची गरज नाही, असा निर्णय पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे.

close