विक्रोळी दारुकांड प्रकरणी 4 जणांना जन्मठेप

April 26, 2012 10:18 AM0 commentsViews: 3

26 एप्रिल

25 डिसेबर 2004 मध्ये मुंबईत विक्रोळी इथं गावठी दारू प्यायल्याने 87 जणांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे 200 जण वेगवेगळ्या आजाराने अधू झाले होते. याप्रकरणी 7 वर्षानंतर कोर्टाने निर्णय देत 19 पैकी 4 आरोपींना खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच्या युनीट सहाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रफुल्ल भोसले पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील सहायक पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी तपास करुन 19 जणांना अटक केली होती. या 19 जणांवर वेगवेगळे आरोप आहेत , आरोपी क्रमांक एक ते सात यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याात आला होता. तर इतरांवर कट रचने आणि गुन्ह्यात सहभागी होण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अखेर आज सात वर्षानंतर न्याय मिळला आहे. 19 पैकी सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

close