प्राध्यापकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम

April 26, 2012 10:32 AM0 commentsViews: 20

26 एप्रिल

राज्यातील दहा विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या संघटनांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम आहे. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे दहा महिन्याची थकबाकी आणि महागाई भत्याच्या फरकाची रक्कम देण्याची मागणी प्राध्यापकांनी केली आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिर्व्हीसिटी अँड कॉलेज टिचर्स या संघटनेशी संलग्न प्राध्यापक या बहिष्कारात सहभागी आहेत. आंदोलन सुरुच असल्यामुळे राज्यभरातल्या पेपर तपासणीवर याचा परिणाम होतोय. या संदर्भात प्राध्यापक आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली, शिक्षण सचिव सही करतील असं सांगून मंत्री गेले. आणि त्यानंतर शिक्षण सचिवांनी सही करण्यास नकार दिला. त्यामुळे प्राध्यापकांनी आंदोलन मागे घ्यायला नकार दिला. आज प्राध्यापक आझाद मैदानात निदर्शनं करणार आहेत.

close