अखेर नक्षलवाद्यांच्या तावडीतून आमदाराची सुटका

April 26, 2012 2:35 PM0 commentsViews: 1

26 एप्रिल

ओडिशाचे आमदार झिना हीकाका यांची अखेर नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. आमदारकीचा राजीनामा देण्याच्या आश्वासनावर हिकाकाची सुटका करण्यात आली आहे. हिकाका एक महिन्यांहून जास्त काळ नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते. त्यांच्या बदल्यात तुरुंगात असलेल्या 29 नक्षलवाद्यांना सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 25 नक्षलवाद्यांना सोडण्याची सरकारने तयारी दाखवली आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया हिकाका यांनी दिली. नक्षलवाद्यांना आपल्याला चांगली वागणूक दिल्याचंही त्यांनी सांगितलंय.

close