अनिल काकोडकर यांना महाराष्ट्र भूषण

April 26, 2012 5:32 PM0 commentsViews: 8

26 एप्रिल

ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. काकोडकर यांनी अणुऊर्जेसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसीत करण्यात काकोडकरांचं मोलाचं योगदान आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात करण्यात आलेल्या अणुचाचण्यांमध्ये काकोडकरांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच काकोडकर यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्षपद, भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालकपदही भूषवले आहे. त्याचबरोबर पोखरण इथे 1998 साली झालेल्या अणुचाचणीत काकोडकर यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच त्यांनी थोरियमचा वापर करून भारताला अणुइंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं. या अगोदर काकोडकर यांना 1998 साली पद्मश्री, 1999 पद्मभूषण आणि 2009 पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

close