लाचखोरीप्रकणी बंगारू लक्ष्मण दोषी

April 27, 2012 9:23 AM0 commentsViews: 7

27 एप्रिल

भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना लाचखोरी प्रकरणात कोर्टाने आज दोषी ठरवलं. तहलका या न्यूज वेबसाईटने केलेल्या पहिल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बंगारू लक्ष्मण लाच घेताना पकडले गेले होते. या प्रकरणी तब्बल 11 वर्षानंतर निकाल लागलाय. कोर्टाने त्यांना आज दोषी ठरवलं. उद्यापासून त्यांच्या शिक्षेवर युक्तीवाद सुरू होईल. 13 मार्च 2001 च्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओने भारतीय राजकारणात भूकंप घडवला. केंद्रात भाजपप्रणित आघाडीची सत्ता असताना.. त्याच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष लाच घेताना या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला. तहलका या न्यूज वेबसाईटने हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यात भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण 1 लाख रुपयांची लाच घेताना दाखवण्यात आलं होतं. तब्बल 11 वर्षांनंतर सीबीआयच्या विशेष कोर्टाने या प्रकरणी लक्ष्मण यांना दोषी ठरवलं. अखेर या प्रकरणी शुक्रवारी कोर्टानं निकाल दिला. निकालानंतर काँग्रेसने भाजपवर खरमरीत टीका केलीय.नामुष्की ओढावलेल्या भाजपने मात्र आपल्याच माजी अध्यक्षाला वाळीत टाकलं. गेल्या काही वर्षांत अनेक स्टिंग ऑपरेशन्स झाली असली. तरी बंगारू हे 'ऑपरेशन वेस्टएंड' नावाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले जाणारे पहिले मोठे नेते होते. तहलकाचं 'स्टिंग', बंगारूंचा भांडाफोड

- तहलकाचा रिपोर्टर शस्त्रास्त्र विक्रेता बनून बंगारूंना भेटला- रिपोर्टरने बंगारूंना भारत सरकारशी शस्त्रास्त्र डील करण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली- त्यासाठी 1 लाख रुपये दिले आणि लक्ष्मण यांनी ते घेतले- 13 मार्चला हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर लक्ष्मण आणि तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना राजीनामा द्यावा लागाला- या प्रकरणाच्या तपासासाठी 2001 साली जस्टिस वेंकटस्वामी आयोगाची स्थापना झाली- 2003 मध्ये जस्टीस फूकन आयोगाकडे तपास सोपवण्यात आला- फूकन आयोगाने फर्नांडिस यांना क्लीन चिट दिली- 2004मध्ये तपास सीबीआयला सोपवण्यात आला- सीबीआयनं गेल्या वर्षी लक्ष्मण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं

बोफोर्स प्रकरणामुळे भाजप आक्रमक होती. आता बंगारूंच्या मुद्द्यामुळे परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे.

close