मुंबई हे देशाचं इंजिन – राहुल गांधी

April 27, 2012 9:47 AM0 commentsViews: 1

27 एप्रिल

मुंबई हे देशाचं इंजिन आहे, आणि आपल्याला मुंबईसारखी अनेक शहरं तयार करायची आहेत असं आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलं. राहुल गांधींनी आज मुंबईत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमानंतर राहुल गांधी दादरला प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक घेत आहे. आज सकाळी राहुल गांधींचे मुंबईत आगमन झाले. मात्र, युवराजांच्या आगमनामुळे सकाळी कार्यालयाकडे निघालेल्या चाकरमाण्यांना फटका बसला. राहुलच्या आगमनामुळे विलेपार्लेजवळ ट्राफिक जाम झालं होतं. उद्या राहुल गांधी सातारा,सांगली या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

close