ताडोबाच्या परिसरात मृत वाघ आढळला

April 27, 2012 11:09 AM0 commentsViews: 5

27 एप्रिल

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या पळसगावाजवळ एक वाघ मृतावस्थेत तर दुसरा जखमी अवस्थेत आढळला आहे. शिकार्‍यांनी लावलेल्या जाळ्यात हे दोन वाघ अडकले. ताडोबा परिसरातील गोंडमोहाडी जंगलातील कपांर्टमेंट क्रमांक 559 मध्ये पानवठ्याजवळ या वाघाचा मृतदेह आढळला. संध्याकाळच्या सुमारास या प्रकाराची माहिती वनविभागाला मिळताच अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमी वाघाला बेशुध्द करुन उपचारासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पाठवण्यात आलं आहे. शिकार्‍यांनी या भागात जवळपास 4 ट्रॅप लावले होते. यामध्ये वनविभागाचा एक कर्मचारी अडकला त्याच्या पायाला जखम झाली आहे. या भागात शिकारी टोळी मोठ्या प्रमाणात सक्रीय असून गेल्या पाच महिन्यातील हीआठवी घटना आहे. मृत वाघाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे.

close