राहुल गांधी अपयशी बॅटसमन – तावडे

April 27, 2012 12:31 PM0 commentsViews: 2

27 एप्रिल

राज्यातील जलसिंचन योजनाच्याबाबत अनुशेषाचा मुद्दा पुढे करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपली कार्यक्षमता, नालायकपणा आणि भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष विनोद तावडे यांनी मिरज इथं केली. विनोद तावडे सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. आज जत तर उद्या आटपाडी तालुक्यातील दुष्काळी गावांना भेट देऊन दुष्काळग्रस्तांशी ते चर्चा करणार आहेत. राहुल गांधी हे लाईन आणि लेन्थ नसलेले फलंदाज असल्याने ते लवकर आऊट होत आहेत अशी टीका विनोद तावडेंनी मिरजेत केली. निवडणुका आल्या की राहुल गांधींना समोर केले जाते, मात्र बिहार, उत्तर प्रदेश अशा राज्यात त्यांना यश मिळवता आलं नाही. राहुल गांधींच्या सातारा दौ-यामुळे केंद्राकडून दुष्काळी भागाला अधिकचा निधी मिळावा अशी अपेक्षा आहे.

close