पुण्यात हुक्का पार्लरवर छापा,21 जण ताब्यात

April 28, 2012 2:26 PM0 commentsViews: 4

28 एप्रिल

पुण्यात शिवाजीनगर येथे रेंज हिल्स कॉर्नर भागात हुक्का पार्लर चालविणार्‍या इन्व्हिटेशन या गार्डन रेस्टॉरेटवर काल रात्री पुणे पोलिसांनी धाड टाकून सात मुलं आणि 15 मुलींना ताब्यात घेतलं आहे. सामजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख भाणूप्रताप बर्गे आणि पुणे पोलिसांनी हा छापा घातला. इथं बेकायदेशीर हुक्का पार्लर चालविला जात असल्याची माहिती पोलिसांकडे होती. मागिल आठवड्यातच एमजी रोडवर एका हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर आज कारवाई करत रेंज हिल्स कॉर्नर भागात हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात तरुण-तरुणींसह हॉटेलच्या कर्मचार्‍यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी हॉटेलमधून हुक्का, हुक्काचे वेगवेगळे फ्लेवर्स,तंबाखू जप्त करण्यात आली आहे.

close