आजपासून बेस्टची भाडेवाढ लागू

April 27, 2012 1:31 PM0 commentsViews: 1

27 एप्रिल

महागाईने होरपाळणार्‍या सर्वसामान्य जनतेला आजपासून दरवाढीचा चटका बसणार आहे. आजपासून बेस्टची भाडेवाढ लागू झाली आहे. ही भाडेवाढ यापूर्वीच बेस्टच्या बैठकीत मंजूर करण्यात आली होती. काल त्याला महापालिका सभागृहाची मंजुरी मिळाली. यामुळे बेस्टचं कमीत कमी भाडं 4 वरून 5 रुपये होणार आहे. तर प्रति 50 किलोमीटरमागे सरासरी 20 रुपयांची भाडेवाढ करण्यात आलीय. एसी बसचं किमान भाडं 15 ऐवजी 20 रुपये असणार आहे. अंध, अपंग आणि विद्यार्थ्यांना या दरवाढीतून वगळण्यात आलं आहे.

close