डॉ.कलाम म्हणतात, ‘जस्ट वेट’

April 28, 2012 4:28 PM0 commentsViews: 3

28 एप्रिल

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती होण्यात रस असल्याचा इन्कार केला नाही. पुन्हा राष्ट्रपती बनण्याची इच्छा आहे काय असं विचारल्यानंतर त्यांनी वाट पाहायला हवी असं उत्तर दिलं. समाजवादी पक्षानं पहिल्यांदा त्यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवलं होतं. दुसरीकडे नवा राष्ट्रपती कोण यावर काँग्रेसने मित्रपक्षांशी चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट झाली होती. दरम्यान, अजूनपर्यंत कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या संरक्षणमंत्री ए. के अँटोनी चेन्नईला जाऊन द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांची भेट घेणार आहेत. तर 4 मे रोजी सोनिया गांधी आणि तृणमुलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यात चर्चा होणार आहे.

close