एन.डी. तिवारींची डीएनए चाचणी होणार

April 27, 2012 5:12 PM0 commentsViews: 7

27 एप्रिल

काँग्रेस नेते एन डी तिवारी यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला आहे. रोहित शेखर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने तिवारींना डीएनए (DNA)चाचणी करण्याचे आदेश दिले आहे. रोहित शेखर यांनी याचिकेत दावा केला की, एन डी तिवारी हे त्यांचे वडील आहेत. तिवारींनी हा दावा खोडून काढला. यापूर्वीही तिवारींनी डीएनए चाचणी करायला विरोध केला होता. पण आता कोर्टाने म्हटलंय की, जर तिवारी चाचणी करणं टाळत असतील, तर पोलिसांची मदत घेऊन त्यांची इच्छेविरुद्ध डीएनए चाचणी करण्यात यावी. सीडी प्रकरणात अडकल्यानंतर तिवारींना आंध्र प्रदेशचं राज्यपालपद सोडावं लागलं होतं.

close