विडी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

November 24, 2008 11:53 AM0 commentsViews: 6

24 नोव्हेंबर सोलापूरसोलापुरातील विडी कामगार कपात करण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय आता स्फोटक होत चालला आहे. आज सर्व पक्षातील विडी कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.या मोर्चात महिला विडी कामगारही मोठ्या संख्येने सामिल झाल्या होत्या. धूम्रपान विरोधी कायद्याचा निषेध यावेळी करण्यात आला. याच कायद्याचा आधार घेत विडी कारखाना मालकांनी 40 टक्के कामगार कपातीचा निर्णय घेतला. त्याला यावेळी विरोध करण्यात आला. परकीय सिगारेटला बाजारपेठ बहाल करण्यासाठी केंद्र सरकार विडी उद्योगावर अन्याय करीत असल्याचं कामगारांनी म्हटलं आहे. कारखाना मालकांनी कामगार कपातीचा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा कामगार नेते नरसय्या आडाम यांनी दिला आहे..

close