डिझेल दरवाढीचे पंतप्रधानांनी दिले संकेत

April 28, 2012 5:10 PM0 commentsViews: 5

28 एप्रिल

महागाईने होरपाळणार्‍या जनतेला आता आणखी धक्का बसणार आहे. डिझेलच्या किंमती दरवाढ करण्याबाबतचे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आयातीवर प्रचंड ताण पडल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही ताण पडल्याचं त्यांनी म्हटलं. कच्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे तेलकंपन्याना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यापासून तेल कंपन्यांनी दरवाढ करण्याबद्दल सरकारला विनंती केली आहे मात्र सरकारने वेट अँन्ड वॉच भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्या चालून अचानक मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

close