राज्यात 1972 सारखी दुष्काळस्थिती – ढोबळे

April 28, 2012 9:43 AM0 commentsViews: 4

28 एप्रिल

राज्यात 1972 सारखीचं दुष्काळी स्थिती असल्याचं राज्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी मान्य केलं आहे. नद्या आणि धरणांमधला पाणीसाठी निच्चांकी असून किमान पिण्याच्या पाण्याचीही सोय राहिलेली नाही असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये सरकारने दुष्काळ सदृष्य स्थिती असल्याचं जाहीर केलं होतं.मात्र, जवळपास सर्व राज्यातच अशी स्थिती आहे. या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून या विषयी आणखी माहिती देणार आहोत असंही ठोबळे म्हणाले आहे.

close