मराठवाड्यातील धरणाची पातळी खालावली

April 28, 2012 10:31 AM0 commentsViews: 28

28 एप्रिल

औरंगाबादला पाणीपुरवढा करणारे मुख्य नाथसागर धरणाची पातळी आता खालावत चालली आहे. यंदा पुरेसा पाऊस होऊन ही धरणाची पातळी खालावत चालली आहे. मराठवाडयातील सर्वात या जायकवाडी धरणामध्ये 11 टक्के इतकाच पाणीसाठी शिल्लक आहे. मराठवाडयावर मोठं जलसंकट ओढवलं आहे. दररोज पाण्याची घट होत असल्यानं मे अखेर जायकवाडी धरणामध्ये पाणी राहिलं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बीड,लातूर,नांदेड, परभणी येथील धरणांची परिस्थितीही घटत चालली आहे.

मराठवाड्यातील धरणांची स्थिती

औरंगाबाद जायकवाडी – 11 टक्के पाणीसाठाबीड माजलगाव धरण- 9 टक्के पाणीसाठालातूर मांजरा धरण- 12 टक्के पाणीसाठा नांदेड विष्णुपुरी धरण- 23 टक्क्‌े पाणीसाठा परभणी येलदरी प्रकल्प- 7 टक्के पाणीसाठा परभणी सिध्देश्वर 10 टक्के पाणीसाठा

close