नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे लोकप्रतिनिधींचे राजीनामे

April 30, 2012 9:01 AM0 commentsViews: 2

30 एप्रिल

ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये आमदार आणि जिल्हाधिकार्‍यांच्या अपहरणांनतर गडचिरोलीमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कारण ग्रामीण भागात दौरे करताना सतर्कता बाळगा असा ऍलर्ट गडचिरोली प्रशासनातर्फे जारी करण्यात आला आहे. जिल्हयातील सर्वच जनप्रतिनिधींना यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी पत्र पाठवलं आहे. जिल्हयात महिन्याभरात नक्षलवाद्याकडूनही हत्यासत्र सुरु झालंय. सर्वच जनप्रतिनिधींना 26 तारखेपर्यंत राजीनामे देण्याचा इशारा नक्षलवाद्यांकडून देण्यात आला होता.

भामरागड, अहेरी या नक्षल प्रभावित भागातील पक्षाच्या अनेक पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये भाजपचे भामरागडचे पदाधिकारी सुनिल विश्वास, राजेंद्र मडावी, भाजप तालुकाध्यक्ष जोगा उंसेडी यांनी राजीनामे दिले आहेत. तर राष्ट्रवादीचे प.स सदस्य गंगाराम भांडेकर तर तालुका अध्यक्ष रामाजी पुंगाडी राजीनामा काँग्रेस पदाधिकारी राजीव वड्डे , नांदडीचे सरपंच मंसराम गावडे यांनी राजीनामे दिले आहेत. पण भामरागडचे तहसिलदार सुरज कवाडघरे यांचं नक्षलवाद्यांनी दोन तासासाठी अपह़रण करुन सोडून दिलं. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य गिता हिचामी यांचंही अपहरण करुन सोडून दिलं. रामलाल मटामी आणि बारीकराव तडमे या सदस्यानी गिता हिचामी यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.

close