ताडोबात वाघांच्या सुरक्षेसाठी लवकरच विशेष फोर्स

April 28, 2012 1:10 PM0 commentsViews: 2

28 एप्रिल

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये शिकार्‍यांनी लावलेल्या सापळ्यात एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ जखमी झाल्याची घटना काल शुक्रवारी समोर आली. हे दोन्ही पट्टेदार वाघ होते. या घटनेची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. आज नॅशनल टायगर कर्झर्वेशन ऑथारिटीचे डायरेक्टर राजेश गोपाळ पळसगावला ताडोबा प्रकल्पात दाखल झाले आहेत. त्यांनी घटनेची पाहणी केली, चंद्रपूर वन विभागात अनेक समस्या असल्याचे त्यांनी मान्य केलं आणि वाघाच्या संरक्षणासाठी स्पेशल टाईगर प्रोटेक्स फोर्सचे प्रोफेशनल कमांडो नियुक्त केल जाणार असल्याचं राजेश गोपाळ यांनी जाहीर केलं.

close