एमईटी प्रकरणी छगन भुजबळांना नोटीस

April 30, 2012 11:34 AM0 commentsViews: 3

30 एप्रिल

एमईटी (MET) प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. फुले, शाहु, आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे छगन भुजबळ आणि नाशिक एमईटी इंजिनियरींग कॉलेजविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती एस.अे.बोबडे आणि मृदुला भटकर यांतच्यासमोर केसची सुनावणी झाली.

छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासह एमईटी ला याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 2 आठवड्यात यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. भुजबळ यांच्या इंजिनियरींग कॉलेजमध्ये कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याचिकाकर्ते स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर यांनी केला आहे. शिक्षण शुल्क समितीने निश्चित केलेल्या फी मध्ये बेकायदेशीरपणे कॉलेजने वाढ केली. आणि विद्यार्थ्यांकडून वाढीव फी वसूल केली, असा ठपका शिक्षण शुल्क समितीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांची वाढीव फी परत करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टात या याचिकेवरची पहिलीच सुनावणी आज झाली. आणि कोर्टानं भुजबळांसहित सगळ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

close