नाशिकमध्ये लोकमतच्या ‘एचबीकेबी’ अभियानाला सुरुवात

April 28, 2012 1:27 PM0 commentsViews:

28 एप्रिल

दैनिक लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एचबीकेबी (HBKB) अर्थात 'हॉर्न बजाने की बिमारी' विरोधातल्या अभियानाला नाशिकमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येत आहे. नाशिकमध्ये या मोहिमेची सुरुवात दैनिक लोकमतने आपल्या कार्यालयापासून केली. विनाकारण हॉर्न वाजवणार नाही अशी शपथ यावेळी लोकमतच्या संपादक,पत्रकार आणि कर्मचार्‍यांनी घेतली. या अभियानाअंतर्गत या आठवडाभरात नाशिकमध्ये याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

close