एअर इंडियाच्या तिकीट दरात लवकरच घट

November 24, 2008 1:00 PM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबरअखेर तिकिटांचे दर कमी करण्यासाठी देशातील सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडियानंच पुढाकार घेतला आहे. एअर इंडिया तिकिटांच्या दरात घट करण्याबाबतची घोषणा लवकरच करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र यात किती घट केली जाईल हे कंपनीला झालेला तोटा आणि एकूण खर्च बघून ठरवलं जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या आवाहनानंतर एअर इंडियानं हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

close