प्राध्यापकांच्या पेपर बहिष्कारवर बुधवारी तोडगा ?

April 30, 2012 7:59 AM0 commentsViews: 7

30 एप्रिल

राज्यभरातल्या 10 विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे पेपर तपसणीला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत उद्या महत्वपूर्ण बैठक होणार आहे. याप्रकरणी बुधवारी तोडगा निघण्याची शक्यता आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. सहाव्या वेतन आयोगासह , नेटसेट ग्रस्त प्राध्यपकांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या मुद्द्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.

close