बलात्कार प्रकरणी अनिल महाबोलेंना जामीन

April 30, 2012 10:09 AM0 commentsViews: 1

30 एप्रिल

बलात्कार प्रकरणी आरोपी असलेल्या निलंबित एसीपी अनिल महाबोले यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. महाबोले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. महाबोले यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. तसेच महाबोले यांनी मुंबई आणि देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावे असे आदेश देण्यात आले आहे. त्यांच्यावर एका महिला इन्सपेक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत महाबोलेंनी कुर्ल्यातील आपल्या घरी येऊन भूल दिली आणि बलात्कार केला.

close