सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांचे अपहरण

April 30, 2012 8:21 AM0 commentsViews: 1

30 एप्रिल

सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली आहेत. सांगलीमध्ये आंबेडकर रोड इथे राहणार्‍या सुकुमार गुगरी यांच्या कुटुंबाचं अपहरण झालं आहे. यामध्ये सुकुमार गुगरी यांच्यासह पत्नी अनिता गुगरी आणि मुलगी सुप्रिया (वय 6) मुलगा शिवाजी (वय 8) यांचे अपहरण झाले आहे. संपूर्ण कुटुंबाचे अपहरण झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पांडुरंग घाडगे सध्या बेपत्ता आहे. याबद्दल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या कुटुंबाच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झालं आहे.

close