अमृता पत्कींची मराठी सिनेमातून एंट्री

April 30, 2012 11:02 AM0 commentsViews: 81

30 एप्रिल

मॉडेल आणि अभिनेत्री अमृता पत्की आता सर्वेश परब दिग्दर्शित 'सत्य,सावित्री आणि सत्यवान' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. अमृतासोबत सचित पाटील, श्रृती मराठे या सिनेमात मुख्य भुमिकेत आहेत. अमृता पत्कीने गायलेल्या एका गाण्याचे शूट फिल्म सिटीमध्ये नुकतचं झालं. प्रफुल्ल देशमुख यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याची कोरिओग्राफी बॉलिवूडचे कोरिओग्राफर राजू खान यांनी केली आहे. यावेळी सिनेमाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी कोरिओग्राफर सरोज खान आवर्जून उपस्थित होत्या. राजकीय रहस्यावर आधारित सत्य, सावित्री आणि सत्यवान हा सिनेमा 15 जूनला रिलीज होत आहे.

close