कापसावरील रजिस्ट्रेशन बंदी मागे

April 30, 2012 11:19 AM0 commentsViews: 2

30 एप्रिल

कापसाच्या निर्यातीबाबत सरकारच्या धोरणावर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत कापूस निर्यातीसंदर्भातील रजिस्ट्रेशनची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे कापूस निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागिल महिन्यात 5 मार्चला बंदी तात्काळ बंदी घालण्यात आली होती. आज झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी, शरद पवार आणि आनंद शर्मा उपस्थित होते.

close