आसाममध्ये बोट उलटून 103 जणांचा मृत्यू

May 1, 2012 11:46 AM0 commentsViews: 2

01 मे 2012

आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीत बोट उलटून 103 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर बोटीतले अनेकजण बेपत्ता आहेत. या बोटीत 250 लोक होते. धुबरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. खराब वातावरणामुळे, बचावकार्यात अडथळे येत आहे. बचावकार्यात लष्कराची मदत घेण्यात येत आहे.मृतांच्या वारसांना 2 लाखांच्या मदतीची घोषणा पंतप्रधन मनमोहन सिंग यांनी केली आहे.

close