ठाणे पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवडीला कोर्टाची स्थगिती

May 1, 2012 12:40 PM0 commentsViews: 1

01 मे

ठाणे महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. पालिकेवर काँग्रेसच्या मनोज शिंदे यांच्या विरोधी पक्षनेतेपदी निवडीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादीकडून संजय भोईर यांनीही याचिका दाखल केली होती. या याचिका प्रकरणाचा अंतिम निर्णय 15 जूनला मुंबई हायकोर्टाने द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसेच कोर्टाने 15 जूनपर्यंत महासभेलाही बंदी घातली आहे. ठाणे पालिकेत शिवसेनेनं काँग्रेसशी ातमिळवणी करुन काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपद बहाल केले होते. यावरुन राष्ट्रवादीने आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती.

close