अबू आझमींना दोन वर्षांची शिक्षा आणि जामीन

April 30, 2012 11:38 AM0 commentsViews: 1

30 एप्रिल

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना दोन वर्षांची शिक्षा माझगाव कोर्टाने ठोठावली. पण 11 हजारांचा दंड भरल्यानंतर कोर्टाने त्यांची सुटका केली. 2000 मध्ये नागपाडा इथं अबू आझमींना चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यासह आणखी 4 जणांना दोन वर्षांची आणि 11 हजार रुपयांचा दंड कोर्टाने ठोठावला. पण दंड भरल्यानंतर हायकोर्टात अपील करण्यासाठी कोर्टाने त्यांनी वेळ दिली आहे.

close