चेन्नईसमोर ‘गंभीर’ आव्हान

April 30, 2012 12:21 PM0 commentsViews: 1

30 एप्रिल

आज आयपीएलमध्ये गौतम गंभीरची कोलकाता नाईट रायडर्स आणि महेंद्रसिंग धोणीची चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येतील. चेन्नईच्या एम चिदम्बरम स्टेडिअमवर रात्री 8 वाजता ही मॅच खेळवली जाईल. गेल्या काही मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्सने मॅचमध्ये कमबॅक केलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्जच्या कामगिरीत मात्र सातत्य नाही. त्यामुळे मॅच घरच्या मैदानावर असली तरी चेन्नईला बलाढ्य कोलकाताचं तगडं आव्हान असणार आहे.

close