अभिनेत्री अचला सचदेव यांचे निधन

April 30, 2012 12:54 PM0 commentsViews: 1

30 एप्रिल

बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री अचला सचदेव यांचं आज निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि तब्बल 130 सिनेमांमध्ये भूमिका केल्या. बलराज सहानी यांच्या 1965मध्ये आलेल्या वक्त सिनेमातली त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या खास स्मरणात आहे. त्यांचा जन्म पाकिस्तानातल्या पेशावरमधला. पण सिनेमासाठी म्हणून त्या मुंबईत आल्या. पुढे क्लिफोर्ड डगलस पिटर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. गेल्या काही दिवसांपासून त्या पॅरेलिससने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र अखेर आज काळाने अचला सचदेव यांच्यावर काळाने झडप घातली.

close