सीताराम कुंटे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त

April 30, 2012 1:12 PM0 commentsViews: 7

30 एप्रिल

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सीताराम कुंटे यांची निवड झाली आहे. आज माजी आयुक्त सुबोध कुमार यांचा कार्यकाळ संपला आहे. सीताराम कुंटे सध्या नियोजन खात्याचे सचिव आहे. तसेच कुंटे हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. कुंटे यांची नियुक्तीसाठी अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना डावलण्यात आलंय. अर्थखात्यात असताना कुंटे यांची कामगिरी चांगली गाजली होती. अलीकडेच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं आपली सत्ता कायम ठेवली आहे. आता नव्या नगरसेवकांसह नव्या आयुक्तांची नियुक्ती झाली आहे.

close