संसदेत भ्रष्टाचारी,चारित्र्यहिन बसलेत – बाबा रामदेव

May 2, 2012 8:52 AM0 commentsViews: 2

02 एप्रिल

संसदेतील काही खासदार हे भ्रष्टाचारी आणि चारित्र्यहिन असल्याची खळबळजनक टीका योगगुरू बाबा रामदेव यांनी यांनी केली आहे. संसदेत चोर, खुनी, दरोडेखोर बसलेत अशी टीका रामदेव यांनी केली. त्याच्या या वक्तव्यामुळे संसदेत आज गदारोळ झाला. हा संसदेता अवमान असल्याचं मत खासदारांनी व्यक्त केली. तसेच बाबांनी माफी मागावी अशी मागणीही काही खासदारांनी केली. तसेच बाबांच्या वक्तव्याचा सर्वपक्षीय खासदारांनी निषेध केला. समाजवादी पक्षाने बाबा रामदेव यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. बाबा रामदेव यांची मानसिक स्थिती योग्य नसल्याची टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे. तर, आमच्या चारित्र्याचं सर्टिफिकेट इतरांनी देण्याची गरज नसल्याचं इतर खासदारांनी म्हटलं आहे.

close