शिवसैनिकांनी ठोकलं जातपडताळणी कार्यालयाला टाळं

April 30, 2012 3:05 PM0 commentsViews: 10

30 एप्रिल

जातपडताळणी कार्यालयातल्या अनागोंदी कारभाराला कंटाळून जातपडताळणी विभागाच्या कार्यालयाला आज शिवसैनिकांनी टाळं ठोकलं. अर्जदारांना योग्य वेळेत जातीचे दाखले मिळत नाहीत, त्यामुळे सामान्य लोकांचे हाल होताहेत. या निषेधार्थ शिवसैनिकांनी या विभागाच्या अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी या कार्यालयावर मोर्चा काढला. पण यावेळी एकही अधिकारी कार्यालयात हजर नव्हता. त्यामुळे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि कार्यकर्त्यांनी या कार्यालयाला टाळे ठोकले. तसेच या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे.

close