लोकप्रतिनिधींचे राजीनामे स्वीकारणार नाही – गृहमंत्री

May 2, 2012 9:21 AM0 commentsViews: 6

02 मे

नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी आणि दबावामुळे गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमधील लोकप्रतिनिधी एकपाठोपाठ राजीनामे देत आहे. पण, असे राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत, असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं. लोकप्रतिनिधींना योग्य ते संरक्षण पुरवलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र सुरू आहे. सर्वच लोकप्रतिनिधींना 26 मे पर्यंत राजीनामे देण्याचा फतवा नक्षलवाद्यांनी काढला आहे.भामरागड, अहेरी या नक्षल प्रभावित भागातल्या अनेक पदाधिकार्‍यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहे. मागिल महिन्यात ओडिशा येथे आमदार, जिल्हाधिकारी तसेच दोन पर्यटकांचे अपहरण करण्यात आले होते. नक्षलवाद्यांच्या दहशतवादामुळे लोकप्रतिनिधींनी राजीनामे देण्यास सुरु केले आहे.

close