भंगारात सापडले ऐतिहासिक ताम्रपट

May 2, 2012 12:56 PM0 commentsViews: 123

02 मे

कल्याणमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय मोलाचे असणारे शालिवाहन काळातले ताम्रपट भंगाराच्या दुकानात सापडले आहे. कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाई दरम्यान, प्रकाश हिराचंद जैन या भंगार व्यापार्‍याकडे ताम्रपट सापडले. हे ताम्रपट शालिवाहन काळातले दानपत्र असल्याचे इतिहासकार श्रीनिवास साठे यांनी सांगितले आहे. हे ताम्रपट तीन पानाचे असून त्यावर राजमुद्रा आहे.

close