नक्षलवाद्यांच्या तावडीतून जिल्हाधिकार्‍यांची सुटका

May 3, 2012 12:06 PM0 commentsViews: 1

03 मे

छत्तीसगगडमधल्या सुकमाचे जिल्हाधिकारी ऍलेक्स पॉल मेनन यांची अखेर सुटका झाली आहे. तब्बल 13 दिवसांनंतर नक्षलवाद्यांनी त्यांना सोडलं आहे. सुटकेनंतर मेनन वाटाघाटीतल्या दोन मध्यस्थांसह चिंतलनारकडे रवाना झाले. चर्चेसाठी माओवाद्यांनी नेमलेले मध्यस्थ बी. डी. शर्मा त्यांच्यासोबत होते. ऍलेक्स यांच्या सुटकेची बातमी येताच त्यांच्या चेन्नईतल्या घरी आनंद साजरा करण्यात आला. मेनन यांना सोडण्याच्या बदल्यात सरकारनं नक्षलवाद्यांच्या काही मागण्या मान्य केल्यात. त्यानुसार नक्षलवाद्यांविरुद्धच्या खटल्यांचा फेरआढावा घेण्यासाठी सरकार एक समिती नेमणार आहे. दरम्यान, सरकारने सांगितलं तर सुकमा जिल्ह्यातच काम करेन, असं मेनन यांनी सांगितलं आहे.

close