शरद पवारांच्या मतदारसंघात पाण्यासाठी वणवण

May 3, 2012 12:29 PM0 commentsViews: 25

03 मे

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती तालुका हा विकासाचा नमुना म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्यातील जिरायत भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामतीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर भीषण पाणीटंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या भागात कर्हावागज, अंजनगाव या भागातल्या गावकर्‍यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागतं आहे. या परिसरात बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आणि हातपंप निकामी आहेत. तर विहिरी कोरडया पडल्या आहेत. या बागातील तसेच 10 गावं आणि 39 वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च करुन बांधलेली कारखेल प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद पडली आहे.

तर दुसरीकडे उस्मानाबाद जिल्हयात हीच परिस्थिती आहे. अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. विहिरी, तळे आटल्यामुळे गावातल्या पाण्याच्या टाकीमध्येसुध्दा पाणी येणं अशक्य झालंय. जिल्हयात तब्बल 470 गावांमध्ये पाणीटंचाई आहे पण फक्त 10 गावांमध्येच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

close