सर्वपक्षीय आमदार जाणार परदेश दौर्‍यावर

May 2, 2012 2:48 PM0 commentsViews: 1

02 मे

आज राज्यात अनेक जिल्ह्यांना दुष्काळाच्या छळा पोहचत असताना आमदार खासदार 'हवा' खाण्यासाठी परदेश दौर्‍यावर निघणार आहे. 12 दिवसांचा हा दौरा आहे. मनसे वगळता सर्व पक्षांतले 24 आमदार परदेशात अभ्यास दौर्‍यावर जाणार आहेत. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने हा दौरा आयोजित करण्यात येतो. यासाठी विधान सभेतल्या पक्षीय बलाबलाच्या आधारावर आमदार संख्या ठरवली जाते. दौर्‍याच्या एकूण खर्चापैकी 1/3 खर्च आमदार आणि 2/3 खर्च राज्य सरकार करतं. दुष्काळाच्या वेळी आमदार आणि मंत्र्यांच्या परदेश दौर्‍यावर जाण्याची गरजच काय आहे अशा मंत्र्यांवर जिल्हाबंदी करा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

close