दिवेआगारमध्ये चांदीच्या गणेशमूर्तीचा निर्णय लांबणीवर

May 3, 2012 12:42 PM0 commentsViews: 2

03 मे

दिवेआगारच्या मंदिरात चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. आजच्या ग्रामसभेच्या बैठकीत यावर शिकामोर्तब होणार होता. पण ग्रामसभेत झालेल्या गोंधळामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. काही गावकर्‍यांनी चांदीची मूर्ती बसवायला विरोधा केला आहे. पुण्यातील जितेंद्र घोडके या व्यापार्‍याने सोन्याचा मुलामा असणारी चांदीची मूर्ती मंदिराला भेट देण्याची घोषणा केली होती. दिवेआागरतील सुवर्ण गणेशमुर्ती प्रमाणेच दिसणार्‍या या चांदीच्या मूर्तीवर 1,320 ग्रॅम सोन्यांचा मुलामा देऊन तयार करण्यात आली आहे. मात्र गावकर्‍यांनी केलेल्या विरोधामुळे बाप्पांची मूर्ती बसवण्याचा निर्णय लांबणीवर गेला आहे.

close