नुपूर तलवार यांची तुरुंगात रवानगी

May 2, 2012 4:31 PM0 commentsViews: 2

02 मे

दिल्लीत गाजत असलेल्या आरुषी आणि हेमराज दुहेरी खून प्रकरणी आरुषीची आई नुपूर तलवार यांची तुरुंगात रवानगी झाली. त्यांचा जामीन अर्ज गाझियाबाद सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. नुपूरविरोधात सीबीआयने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलं होतं. त्याविरोधात नुपूर यांनी सीबीआय कोर्टात अर्ज दाखल केला होता. कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला. सेशन्स कोर्टानंही आज हा जामीन फेटाळल्याने त्यांना तुरुंगात जावं लागलं. उद्यापासून सीबीआय कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.

close