बसस्टॉपवर वीजेचा शॉक लागल्याने तरुणांचा मृत्यू

May 3, 2012 2:29 PM0 commentsViews: 4

03 मे

मुंबईतल्या माहिममध्ये बेस्टच्या बसस्टॉपवर एका तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. करीम शेख असं या 21 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. बेस्ट बसस्टॉपवरील जाहिरातीच्या बोर्डमधील वीजेचा धक्का लागून या तरूणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावान्या बसस्टॉपची तोडफोड केली . तसेच इतर सात बसस्टॉपवरील होर्डिंगचीही या संतप्त जमावाने तोडफोड केली. माहिम पोलीस स्टेशमध्ये यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

close