हिंगोलीतील सरकारी हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचे हाल

November 24, 2008 2:00 PM0 commentsViews:

24 नोव्हेंबर, हिंगोली हिंगोलीच्या आदिवासी मुलांच्या सरकारी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. पिण्यासाठी साधं स्वच्छ पाणीसुद्धा या विद्यार्थ्यांना मिळत नाही. विद्यार्थ्यांना दोन-दोन किलोमीटरवरुन पाणी आणावं लागतं. जेवणाचीसुद्धा धड व्यवस्था नाही. हॉस्टेलमध्ये आणि आसपास घाणीचं साम्राज्य पसरलंय. लाईटची व्यवस्था नीट नाही.अपुर्‍या प्रकाशामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होतोय. आदिवासींच्या विकासासाठी सरकार लाखो रुपये खर्च करतेय मात्र याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचतच नाहीय. होस्टेलच्या प्रकल्प अधिकार्‍यांनीही होस्टेलच्या इमारतीमध्ये असलेल्या गैरसोयी असल्याचं मान्य केलं आहे.

close