मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

May 3, 2012 2:40 PM0 commentsViews: 1

03 मे

आज भारतीय चित्रपट सृष्टी शंभराव्या वर्षात पदार्पण करतेय. त्याचं औचित्य साधून.. आज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या पुरस्काराचं दिल्लीत वितरण झालं. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये शाळा, देऊळ आणि बालगंधर्व या 3 मराठी चित्रपटांनी बाजी मारली. या चित्रपटांना एकूण 8 पुरस्कार मिळाले आहे. तसेच 'द डर्टी पिक्चर'मधली अभिनयासाठी विद्या बालन हिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गिरीश कुलकर्णी यांना देऊळमधील अभिनयासाठी आणि संवाद लेखनासाठी पुरस्कार देण्यात आला. तर शाळाला सर्वश्रेष्ठ मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. बालगंधर्वमधील पार्श्वगायनासाठी आनंद भाटे यांना तर वेशभूषा नीता लुल्ला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात बालगंधर्व चित्रपटाचे गायक आनंद भाटे यांनी 'चिन्मया सकल ह्रदया' या गाण्याने उपस्थितांची मनं जिंकली.

close