दिवेआगरमध्ये चांदीची गणेश मूर्ती ?

May 3, 2012 9:15 AM0 commentsViews: 15

03 मे

दिवेआगारच्या मंदिरात चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. आजच्या ग्रामसभेच्या बैठकीत यावर शिकामोर्तब होणार आहे. पुण्यातील जितेंद्र घोडके या व्यापार्‍याने सोन्याचा मुलामा असणारी चांदीची मूर्ती मंदिराला भेट देण्याची घोषणा केली होती. दिवेआागरतील सुवर्ण गणेशमूर्ती प्रमाणेच दिसणार्‍या या चांदीच्या मूर्तीवर 1,320 ग्रॅम सोन्यांचा मुलामा देऊन तयार करण्यात आली आहे. दरम्यान, चोरांनी वितळवलेलं सोन पोलिसांना हस्तगत केलं असून ते मंदिर व्यवस्थापनाच्या ताब्यात दिलं जाणार आहे अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

close