पुणे बाँम्बस्फोट प्रकरणी सिद्दीकी एटीएसच्या जाळ्यात

May 3, 2012 4:10 PM0 commentsViews: 3

03 मे

पुण्यात 13 फेबु्रवारी 2010 ला जर्मन बेकरीत झालेल्या स्फोट झाला होता यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरातही बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न करणारा मोहम्मद सिद्दीकी हा पुणे एटीएसच्या जाळ्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी सिद्दीकीला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याला पुण्यातील विशेष कोर्टात हजर केलं असता 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या 2 दिवस आधी यासिन भटकळ आणि मोहम्मद सिद्दीकी या दोघांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसराला भेट दिली होती. फुलवाल्याकडे स्फोटकाची बॅग देऊन स्फोट घडवण्याचा अतिरेक्यांचा इरादा होता. पण फुलवाल्याने बॅग स्वीकारायला नकार दिल्याने हा प्लॅन फसला.

close