जकातीच्या बोगस पावत्या बनवणार्‍या गँगचा पर्दाफाश

May 3, 2012 9:34 AM0 commentsViews: 1

03 मे

मुंबई क्राईम ब्रँचच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी जकातीच्या बोगस पावत्या बनवणार्‍या एका गँगचा उलगडा केला आहे. या गँगने मुंबई महानगर पालिकेची दहा कोटींची जकात बुडवल्याचं उघडकीला आलं आहे. अटक केलेल्यांमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याचाही समावेश आहे. पालिका अधिकार्‍यांनी काही कंपन्यांना जकात चुकवेगिरीबद्दल नोटिशी पाठवल्या होत्या. त्यावेळी त्या कं पन्यांनी आपण चेकद्वारे जकात भरल्याचे लक्षात आणून दिलं. तेव्हाच यात काहीतरी गडबड असल्याचं पालिकेच्या लक्षात आलं. यानंतर पालिकेने मुंबई क्राईम ब्रँचच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली,यानंतर केलेल्या तपासानंतर पोलिसांनी दहाजणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या एजंटस्‌मध्ये रोहित गायकवाड हा महत्वाचा आरोपी आहे. रोहित एका राजकीय पक्षाचा सदस्य आहे. त्याने नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती.

close