सिंधुदुर्गात आदिवासींच्या घरांकडे सरकारचे दुर्लक्ष

May 3, 2012 9:42 AM0 commentsViews: 1

03 मे

आदिवासी विकास मंत्रालयच आदिवासींच्या टाळूवरचं लोणी कसं खातंय याचं उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतंय. नारूर गावातल्या बावीस आदिवासी कुटुंबांसाठी या मंत्रालयाच्या योजनेतून बांधून देण्यात आलेली घरं गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहेत. घराला ना दार,ना छप्पर, ना वीज ना शौचालय अशा स्थितीत या आदिवासींना वार्‍यावर सोडून देण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातल्या खालापूर मधल्या आदिवासी विकास संस्थेकडे हे 22 लाखांचं काम सोपवण्यात आलं होतं.

मात्र, या संस्थेच्या कंत्राटदाराने ही घरं अर्धवट अवस्थेत सोडून या योजनेतून लाखो रुपये लाटल्याचे हे आदिवासी सांगत आहे. याबाबत आदिवासी मंत्रालयाकडे अनेकवेळा दाद मागूनही अद्याप या विभागाचा एकही स्थानिक किंवा विभागीय अधिकारी या घरांची एकदाही पाहणी करण्यास आलेला नाही. येत्या पावसाळ्यात या घरांना गंभीर धोका असून ही घरं सोडून पुन्हा एकदा माळरानावरच राहण्याचा विचार हे आदिवासी करत आहे.

close